ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी कोरल ड्रॉचे दरवर्षी नवीन व्हर्जन येत असले तरी त्यामध्ये बेसिक कमांड्स त्याच असतात. ज्या ग्राफिक डिझाईनसाठी आवश्यक असतात. अजूनही प्रोफेशनल आर्टिस्ट X3, X15, X16, X17 ही जुनीच व्हर्जन वापरतात. ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच ग्राफिक डिझाईन शिकणारे विद्यार्थी, प्रिंट पब्लिकेशन व्यावसायिक आणि कलेची आवड असणाऱ्यांसाठी वापरायला एकदम सोपे असणाऱ्या CorelDRAW X6 ह्या व्हर्जनचा कोर्स पब्लिश केला आहे. किमान आवश्यक त्याच कमांड्स वापरून प्रिंट, पब्लिकेशन, पॅकेजिंग आणि बिझनेस प्रमोशनसाठी कोणत्याही प्रकारचे डिझाईन तुम्ही करू शकता.
परिपूर्ण ग्राफिक डिझाईनर म्हणून करिअर करण्यासाठी All in One Graphic Design Course आहे. त्यामधील पाच मुख्य विषय कोणते? हा कोर्स केल्यावर तुम्ही कोणकोणती डिझाईन बनवू शकता. तसेच ग्राफिक डिझाईनमधील विविध करिअर संधींच्या माहितीसाठी हा खालील व्हिडीओ पाहा आणि त्यानंतर कोरल ड्रॉ X6 ह्या कोर्समधील लेसन्स क्रमशः शिकायला सुरुवात करा.
कोर्सच्या लेसनखाली दिलेल्या असाईनमेंट्स पूर्ण करा. पुन्हा पुन्हा लेसन्स पाहून प्रॅक्टिकल करा. एक्झाम द्या. 30 दिवसात कोरल ड्रॉ या व्हेक्टर ग्राफिक सॉफ्टवेअर कोर्सनंतर तुम्ही 30 दिवसात फोटोशॉप, 20 दिवसात प्रि-प्रेस डिझाईन, 20 दिवसात वेब डिझाईन आणि 20 दिवसात सोशल मीडिया डिझाईन कोर्स पूर्ण करा. म्हणजे तुम्ही एक परिपूर्ण ग्राफिक डिझाईनर म्हणून करिअरला सुरुवात करू शकता.
All in one Graphic Design हा Course ऑफलाईनही उपलब्ध आहे.