नमस्कार मित्रानो,
‘ऑल इन वन ग्राफिक डिझाईन’ ह्या साध्या आणि सोप्या कोर्समध्ये व्हेक्टर ग्राफिक डिझाईनसाठी कोरल ड्रॉ, रास्टर ग्राफिक डिझाईनसाठी फोटोशॉप आणि कोणत्याही प्रकारच्या प्रिंटिंगसाठी प्रिंट रेडी आर्टवर्क बनवण्यासाठी प्री-प्रेस ग्राफिक डिझाईन कोर्सचा समावेश आहे. प्रिंटिंग नंतर वेब साईटसाठी वर्डप्रेस प्लॅटफॉर्ममध्ये वेब डिझाईन आणि ब्लॉगिंगचा प्रॅक्टिकल अभ्यास आहे. आणि शेवटी व्यवसायाच्या जाहिरात / प्रमोशनसाठी सोशल मिडिया डिझाईनचा लाईव्ह अभ्यास आहे. हा कोर्स कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
ज्यांना प्रिंट आणि वेब मिडियासाठी परिपूर्ण ग्राफिक डिझाईन शिकायचे आहे. किंवा ज्यांना प्रिंट, वेब आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून स्वतःचे किंवा त्याच्या व्यवसायाचे प्रमोशन करायचे आहे त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. ज्यांना कलेची आवड आहे आणि ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी करिअरचा हा सर्वोत्तम पर्याय आहे. आणि हो, ज्यांना जॉबच करायचा असेल तर त्यांना सहज ग्राफिक डिझाईनर म्हणून जॉबही मिळतो.
पहिला सॅम्पल लेसन व्हिडीओ पाहा, म्हणजे ग्राफिक डिझाईन आणि त्यामधील करिअरची व्याप्ती तुमच्या लक्षात येईल. दहा महिन्याच्या ह्या एकाच कोर्समध्ये परफेक्ट ग्राफिक डिझाईनर बनवणारा किमान आवश्यक तो सर्व प्रॅक्टिकल अभ्यास आहे. हा कोर्स तुम्ही घरबसल्या तुमच्या वेळेत, तुमच्या सवडीनुसार केंव्हाही पूर्ण करू शकता. ग्राफिक डिझाईनविषयी तुमच्या प्रत्येक शंकेचं योग्य निरसन करणारा ‘ऑल इन वन ग्राफिक डिझाईन’ हा एकमेव मराठी कोर्स आहे….