‘All in One Graphic Design Course’ मध्ये तुम्ही काय शिकाल?

नमस्कार मित्रानो,

ग्राफिक डिझाईन शिकून हमखास नोकरी मिळविण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी पाच विषयांचा प्रॅक्टिकल अभ्यास All in One Graphic Design Course मध्ये आहे.  

  1. Vector Graphic Design 
  2. Raster Graphic Design
  3. Pre-Press Graphic Design
  4. Web Design and Blogging आणि 
  5. Social Media Graphic Design

1. व्हेक्टर ग्राफिक डिझाईन : 

व्हेक्टर ग्राफिक डिझाईन ही ग्राफिक डिझाईन शिकण्याची पहिली स्टेप आहे. व्हेक्टर ग्राफिक डिझाईनमध्ये लाईन्स, शेप्स ड्रॉ करून विविध कलर्स, टेक्स्ट आणि काही स्पेशल इफेक्ट्सच्या साहाय्याने विशिष्ट साईजमध्ये डिझाईन बनवायचे असते. त्यामध्ये आकर्षक लेआऊट / कॉम्पोझिशनच्या दृष्टीने खूप काही शिकावं लागतं. व्हेक्टर डिझाईन हे कोणत्याही साईजमध्ये बनवून ते कितीही लहान किंवा मोठे केल्याने डिझाईनच्या क्वालिटीमध्ये काहीही फरक पडत नाही. पण हे करत असताना काही बेसिक गोष्टी समजून घ्याव्या लागतात. व्हेक्टर ग्राफिक डिझाईनसाठी अनेक सॉफ्टवेअर्स आहेत पण प्रोफेशनल क्रिएटिव्ह व्हेक्टर ग्राफिक डिझाईन बनवण्यासाठी विशेषतः कोरल ड्रॉ किंवा इलस्ट्रेटर या प्रोफेशनल सॉफ्टवेअर्सपैकी कोणतेही सॉफ्टवेअर वापरले तरी चालते. व्हेक्टर ग्राफिक डिझाईनची मूळ संकल्पना समजण्यासाठी कोरल ड्रॉ हे प्रोफेशनल आणि सोपे सॉफ्टवेअर कोर्सच्या पहिल्या भागात आपण शिकणार आहात. या पहिल्या भागातील कोरल ड्रॉचे एकूण 30 व्हिडीओ लेसन्स आहेत. त्यानुसार तुम्हाला सराव करायचा आहे. प्रत्येक लेसनच्या खाली त्या त्या लेसनवर आधारित असाईनमेंट्स दिलेल्या आहेत. त्या तुम्ही दोन दिवसात पूर्ण करायच्या आहेत. लेसन संबंधित कोणतीही शंका असेल तर support@artekeducation.com या ईमेलला तुम्ही पाठवू शकता. त्या शंकेचे निरसन ज्या त्या वेळी केले जाईल. 

 व्हेक्टर ग्राफिक्सची एकदा संकल्पना समजली कि तुम्ही इतर कोणतेही व्हेक्टर ग्राफिक डिझाईन सॉफ्टवेअर सहज शिकू शकता.  बिझनेस प्रमोशन, प्रिंट पब्लिशिंग, प्रिंट पॅकेजिंग, आणि वेब मीडिया डिझाईनसाठी व्हेक्टर ग्राफिक डिझाईनची गरज असते. त्या दृष्टीने किमान आवश्यक अभ्यास व्हेक्टर ग्राफिक डिझाईनमध्ये आहे. पुढच्या लेसनमध्ये रास्टर ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ते पाहा. पुढचा लेसन ओपन होण्यासाठी या लेसन पेजच्या टॉप किंवा बॉटमला असलेल्या Mark Complete बटनवर क्लिक करा. 

2. रास्टर ग्राफिक डिझाईन : 

व्हेक्टर ग्राफिक डिझाईन शिकल्यानंतर रास्टर ग्राफिक डिझाईन  शिकणं ही ग्राफिक डिझाईन शिकण्याची दुसरी महत्वाची स्टेप आहे. लाईन, शेप, कलर, टेक्स्ट आणि फोटो मिळून ग्राफिक डिझाईन बनते. पैकी लाईन, शेप, कलर आणि टेक्स्टचा अभ्यास कोर्सच्या पहिल्या भागात कोरल ड्रॉ या व्हेक्टर सॉफ्टवेअर मध्ये आहे. आणि फोटो म्हणजेच इमेज एडिटिंगचा अभ्यास कोर्सच्या दुसऱ्या भागात फोटोशॉप या रास्टर सॉफ्टवेअरमध्ये आहे. आजच्या लेसनमध्ये रास्टर ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ते थोडक्यात समजून घ्या. 

रास्टर ग्राफिक डिझाईनमध्ये प्रामुख्याने इमेज एडिटिंगचा अभ्यास असतो. इमेज ही असंख्य पिक्सल्सनी बनलेली असते. एक पिक्सल म्हणजे एक कलर असतो. इमेजची क्वालिटी पिक्सल्सच्या संख्येवर अवलंबून असते. कॅमेऱ्याने काढलेला फोटो आणि स्कॅन केलेली कोणतीही इमेज हा रास्टर ऑब्जेक्ट असतो. दोन किंवा अधिक फोटो / इमेजीस एकत्र घेऊन विशिष्ट पद्धतीने विशिष्ट साईजमध्ये  डिझाईन बनवायचं असतं. इथे इमेजचा साईज कमी केला तरी चालतो. पण जर साईज मोठा केला तर इमेजची क्वालिटी बिघडते. म्हणून इमेज एडिट करताना खूप काळजी घ्यावी लागते. परफेक्ट फोटो एडिटिंग आणि मिक्सिंग करून क्रिएटिव्ह डिझाईन बनवताना अत्यंत महत्वाच्या काही बेसिक गोष्टी समजून घेऊन नियमित सराव करावा लागतो. कला, कल्पनेसह फोटोमिक्सिंगची विविध कौशल्ये शिकायची असतात. रास्टर ग्राफिक डिझाईन अर्थात फोटो एडिटिंगसाठी विविध ऍप्स आणि सॉफ्टवेअर्स आहेत, पण फोटोशॉप हे इमेज एडिटिंगसाठी एकमेव जगमान्य सॉफ्टवेअर आहे. त्याचा किमान आवश्यक प्रॅक्टिकल अभ्यास कोर्सच्या या दुसऱ्या भागात आहे. पुढच्या लेसनमध्ये कोर्सचा तिसरा भाग ‘प्रि-प्रेस ग्राफिक डिझाईन’ विषयी माहिती दिली आहे. . पुढचा लेसन ओपन होण्यासाठी या लेसन पेजच्या टॉप किंवा बॉटमला असलेल्या Mark Complete बटनवर क्लिक करा.

3. प्रि-प्रेस ग्राफिक डिझाईन :

व्हेक्टर आणि रास्टर ग्राफिक डिझाईन एकत्र करून विविध प्रकारच्या प्रिंटिंगसाठी प्रिंटिंगच्या प्रकारानुसार ग्राफिक डिझाईन करण्याच्या पद्धती म्हणजेच प्रि-प्रेस ग्राफिक डिझाईन. ह्यामध्ये प्रिंट टेक्नॉलॉजीचा अभ्यास करून त्यानुसार डिझाईन बनवावे लागते. ऑफसेट प्रिंटिंग, स्क्रीन प्रिंटिंग, रोटो ग्रेव्हिअर प्रिंटिंग, फ्लेक्झो प्रिंटिंग, डिजिटल प्रिंटिंग असे प्रिंटिंगचे अनेक प्रकार आहेत. डिझाईनमध्ये  फ्लायर, फोल्डर, पोस्टर, बॅनर डिझाईन, न्यूज पेपर डिझाईन, मॅगझीन ऍड डिझाईन, पाऊच पॅकेजिंग डिझाईन, बॉक्स पॅकेजिंग डिझाईन अशा अनेक प्रकारची डिझाईन्स बनवताना ज्या त्या प्रकारच्या प्रिटिंगनुसार विशिष्ट पद्धतीने डिझाईन आणि प्रिंट रेडी आर्टवर्क बनवायचे असते. विविध प्रकारच्या प्रिंट डिझाईनचा साईज कसा घ्यावा, विषयानुरूप फोटो कोणता वापरावा, त्याची क्वालिटी चेक करणे, हेड लाईन, कॉपी मॅटर कसा असावा. फॉन्ट कसा निवडावा, लेआऊट कॉम्पोझिशन  कसे करावे, कलर स्कीम कशी असावी, फोर कलर सेपरेशनसह स्पेशल पाचवा, सहावा कलर कसा प्रिंट होतो, त्याचे आर्टवर्क कसे बनते. आदी अनेक गोष्टींचा विचार प्रि-प्रेस डिझाईन आणि प्रिंट रेडी आर्ट वर्क करताना करावा लागतो. कोरल ड्रॉ आणि फोटोशॉप एकत्र वापरून प्रिंटिंगसाठी अशी डिझाईन्स बनवताना कला, कल्पना आणि कैशल्याची गरज असतेच. हा सर्व प्रॅक्टिकल अभ्यास कोर्सच्या या भागात प्रि-प्रेस ग्राफिक डिझाईन कोर्स मध्ये आहे. 

4. वेब डिझाईन अँड ब्लॉगिंग : WordPress

प्रिंट मिडिया नंतर ग्राफिक डिझाईन इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मागणी असलेलं क्षेत्र म्हणजे वेब डिझाईन आणि ब्लॉगिंग. पहिल्या तीन कोर्सेसमधून डिझाईनची संकल्पना समजलेली असते. त्यामुळे वेब डिझाईन शिकताना थोडं सोपं होतं. किंबहुना वेब डिझाईन बनवताना आधीच्या तीन कोर्समधील अभ्यासाचा नक्कीच उपयोग होतो. फक्त डिझाईन बनवण्याची पद्धत आणि प्लॅटफॉर्म वेगळा असतो. जगातील एकूण वेब साईट्सपैकी 45 टक्के वेब साईट्स ज्या प्लॅटफॉर्मवर बनल्या आहेत त्या वर्डप्रेस (WordPress) प्लॅटफॉर्मवर वेबसाईट आणि ब्लॉग बनवायचा प्रॅक्टिकल अभ्यास ह्या चौथ्या भागात आहे.  ह्या मध्ये डोमेन रजिस्ट्रेशन करणे, वर्डप्रेस इन्स्टॉलेशन, बेसिक लेआऊटसाठी  डिझाईन थिम निवडणे, कलरस्कीम ठरवणे. बेसिक सेटिंग मध्ये हेडर, फूटर, साईड बार, विजिट्स आदी सेटिंग करणे, गरजेनुसार विविध वेब पेजेस बनवणे, ब्लॉग पोस्ट लिहीणे, ब्लॉग पोस्ट करणे, कॉन्टॅक्ट फॉर्म बनविणे, तसेच वेब साईटसाठी आवश्यक इतर अनेक गोष्टीचा समावेश कोर्सच्या ह्या चौथ्या भागातील वेब डिझाईन अँड ब्लॉगिंग कोर्स मध्ये आहे. कोर्समध्ये तुम्हाला तुमची स्वतःची वेबसाईट प्रत्यक्ष बनवायची आहे. ज्यामुळे तुमचे स्वतःचे, तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करण्यासाठी मदत होईल. शिवाय तुम्ही तुमच्या कस्टमरचीही वेबसाईट बनवू शकता. 

5. सोशल मिडिया डिझाईन : 

ऍडव्हर्टायझिंग, मार्केटिंग आणि बिझनेस प्रमोशनसाठी सध्याचा सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय  मिडिया म्हणजे सोशल मिडिया आहे. प्रत्येकाच्या हातात असलेल्या मोबाईलपर्यंत पोहोचलेल्या फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम, ट्विटर (X), लिंक्ड इनसारख्या सोशल मिडियामध्ये बिझनेस प्रमोशनसाठी आकर्षक पोस्ट डिझाईन आणि व्हिडीओ बनविण्याचा अभ्यास कोर्सच्या ह्या पाचव्या भागात आहे. त्यामध्ये फेसबुक, लिंक्ड इन साठी बेसिक सेटिंग करणे, पोस्ट तयार करणे. युट्युब चॅनल बनविणे, व्हिडिओ मेकिंग, व्हिडिओ एडिटिंग आदी किमान आवश्यक गोष्टी तुम्ही शिकणार आहात. आधीच्या चार कोर्समधील अभ्यासावर आधारित वेगवेगळ्या पद्धतीने ज्या त्या सोशल  मिडियानुसार इफेक्टिव्ह डिझाईन आणि व्हिडीओ बनवून पोस्ट करणे, लीड्स जनरेट करण्यासाठी कल्पक जाहिरात डिझाईन करणे. आदी प्रॅक्टिकल अभ्यास ह्या कोर्समध्ये आहे. डिजिटल मार्केटिंगसाठी ग्राफिक डिझाईनचा हा साधा आणि सोपा अभ्यासक्रम आहे. जो करून ग्राफिक डिझाईनच्या प्रिंट आणि वेब प्रोजेक्ट्सबरोबरच तुम्ही तुमच्या स्वतःच्या आणि तुमच्या कस्टमरच्या व्यवसाय वृद्धीसाठी आकर्षक डिझाईन्स आणि व्हिडीओ पोस्ट करून फ्री आणि पेड प्रमोशन करू शकता. 

हमखास नोकरी मिळविण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी ह्या पाचही विषयांचा क्रमशः प्रॅक्टिकल अभ्यास करण्याची गरज आहे. ऍडव्हर्टायझिंग, प्रिंटिंग, वेब आणि सोशल मिडियासाठी कोणत्याही प्रकारचे डिझाईन बनवण्याची क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे, तरच तुम्हाला एक परिपूर्ण ग्राफिक डिझाईनर म्हणता येईल. ग्राफिक डिझाईन क्षेत्र खूप मोठे आहे, दररोज नवीन टेक्नॉलॉजी येत असते त्यासाठी नियमित अभ्यास करून अपडेट राहण्याची गरज असते. ग्राफिक डिझाईन हे केवळ डिझाईन नाही तर ती एक कल्पक दृष्टी आहे, सृजनशील विचार आहे, विविध माध्यमांद्वारे व्यवसाय वृद्धीचं परिणामकारक साधन आहे. इंटरनेटवरील ग्राफिक  डिझाईन कोर्सेसच्या भाऊ गर्दीत नेमका कोणता कोर्स करायला पाहजे? कुठे शिकायला पाहिजे? हे समजत नसेल किंवा लाखो रुपये फीची ग्राफिक डिझाईनमधील डिग्री करूनही अजून बेकार असाल तर ग्राफिक डिझाईनमधील हमखास करिअरसाठी हा एकदम साधा आणि सोपा कोर्स करिअरचा शेवटचा पर्याय आहे.

₹19,999

All in One Graphic Design Course with AI (Online)

This one-year professional online course includes Corel Draw for vector graphic design, Photoshop for raster graphic design, color study, and comprehensive pre-press graphic design techniques for all types of printing. After printing, there is practical training in web design and blogging on the WordPress platform. Finally, there is a study of social media design for business growth. Get Job or start your own business. This is the best and only option for a career in graphic design for everyone who has a passion for art.

Scroll to Top