पाच विषयांचा प्रॅक्टिकल अभ्यास पूर्ण झाल्यावर जाहिरात, प्रिंटिंग, वेब आणि सोशल मीडियासाठी तुम्ही अनेक प्रकारची डिझाईन्स बनवू शकता.

1. लोगो डिझाईन :
कोणत्याही व्यवसायाच्या सुरुवातीला त्या व्यवसायाची आयडेंटिटी म्हणून ओळखला जाणारा लोगो बनवायचा असतो. 

2. कार्पोरेट आयडी डिझाईन :
म्हणजे त्या व्यवसायाचे बिझनेस कार्ड, लेटरहेड आणि इन्व्हलप डिझाईन करायचे असते. जी त्या व्यवसायाची पहिली ओळख आणि पहिले इंप्रेशन असते.  

3. स्टेशनरी डिझाईन :
व्यवसायासाठी नियमित लागणारी स्टेशनरी उदा. बिल बुक, रिसीट बुक, अशी डिझाईन्स बनवायची असतात. 

4. लिफलेट / फ्लायर डिझाईन :
कंपनी किंवा प्रोडक्ट्च्या माहितीचं सिंगल पेज फ्रंट किंवा बोथ साईड प्रिंट केलेलं हे लीफलेट असतं. त्यालाच फ्लायर असंही म्हणतात. 

5. फोल्डर / बुकलेट डिझाईन :
एक किंवा दोन ठिकाणी फोल्ड केलेलं फ्रंट-बॅक दोन किंवा तीन पानाचं हे फोल्डर असतं. विशेषतः कंपनी प्रोफाईल आणि प्रॉडक्ट कॅटलॉगसाठी फोल्डर किंवा बुकलेट डिझाईन्स बनवायची असतात. 

6. पोस्टर आणि बॅनर डिझाईन:
कंपनी, प्रॉडक्ट जाहिरात किंवा प्रमोशनच्या उद्देशाने वॉल पोस्टर आणि बॅनर डिझाईनची आवश्यकता असते. 

7. होर्डिंग डिझाईन : 
रस्त्यांच्या बाजूला, इमारतींच्या वर मोठ्या आकारामध्ये प्रिंट केलेल्या ह्या ज्या  जाहिराती दिसतात त्याला होर्डिंग म्हणतात. जाता येता लोकांचे सहज लक्ष वेधून घेण्यासाठी अशी होर्डिंग डिझाईन्स बनवायची असतात. 

8. स्टिकर डिझाईन :
प्रॉडक्टवर, भिंतीवर, अशा विविध ठिकाणी चिटकवलेली विविध स्कीम्स, ऑफर्स यांची स्टिकर्स आपण नेहमीच पाहतो. 

9. डॅन्गलर डिझाईन (Dangler Design) :
दुकान, शोरूम आणि मॉलमध्ये आकर्षक आकारात डाय कट केलेली छताला दोऱ्याने लटकवलेली जाड तगडावर दोन्ही बाजूनी प्रिंट केलेली जी डिझाईन्स असतात त्याला डॅन्गलर म्हणतात. येन केन प्रकारे ग्राहकाला आकर्षित करून त्याला आठवण करून देण्याचं काम हे डॅन्गलर करतं. 

10. आय कार्ड डिझाईन :
शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी, संस्थेतील कर्मचारी, कंपनीमधील कामगार यांच्यासाठी आयकार्ड करायचे असते. कार्ड होल्डर आणि रिबनसह विविध प्रकारच्या मटेरिअलवर प्रिंट करून ते बनवायचे असते.  

11. स्टँडी डिझाईन :
दुकान, शोरूमच्या गेटवर, मॉलमध्ये, प्रदर्शनात स्टॉलसमोर जमिनीवर ठेवलेल्या साधारणपणे ३ बाय ६ फुटाच्या ह्या स्टँडी असतात. 

12. साईन बोर्ड डिझाईन:
चहाच्या टपरीपासून ते दुकाने, शोरूम, ऑफिसेस, मॉल पर्यंत प्रत्येक ठिकाणी साईन बोर्ड लागतोच. 

13. पॅकेजिंग – लेबल डिझाईन :
अनेक प्रकारच्या विविध आकारातील प्लास्टिक किंवा काचेच्या बॉटलवर प्रिंट केलेले किंवा चिटकवलेले लेबल असते. प्रोडक्ट्चा आकार आणि प्रिंटींग च्या प्रकारानुसार हे डिझाईन बनवायचे असते.  

14. पॅकेजिंग – बॉक्स डिझाईन :
दैनंदिन जीवनात लागणारे साबण, टूथपेस्ट, मसाले, औषधे, असे असंख्य  नित्योपयोगी प्रॉडक्ट्स बॉक्समध्ये पॅक केलेले असतात. मॉलमध्ये एक फेरफटका मारला तर शेकडो प्रॉडक्ट्स तुम्हाला बॉक्समध्ये पॅक केलेले दिसतील. 

15. पॅकेजिंग – पाऊच डिझाईन :
बडीशेपच्या छोट्या पुडीपासून, विविध मसाले, व्हेपर्स, तेल, बेकरी प्रॉडक्ट्स अशा अनेक गोष्टी प्लास्टिक पाऊचमध्ये पॅक केलेल्या असतात. 

16. पब्लिकेशन – बुक कव्हर डिझाईन :
प्रिंट प्रकाशनामध्ये बुक कव्हर डिझाईनला खूप महत्व असते. पूर्ण पुस्तक वाचून त्याच्या आशयानुरूप कल्पकतेने अर्थपूर्ण आणि आकर्षक कव्हर डिझाइन बनवावे लागते. 

17. पब्लिकेशन – वर्तमानपत्र / मासिक :
तुमच्या रोजच्या परिचयाचे असलेले वर्तमानपात्र / मासिक हे ग्राफिक डिझाईनचे उत्तम उदाहरण आहे. फोटोसह बातम्यांची रचना, हेडलाईन, विविध आकाराच्या जाहिराती, त्यांची मांडणी, पुरवणीमधील कथा, विविध सदरे अशा अनेक गोष्टींसाठी आकर्षक आणि कल्पक डिझाईनची गरज असते.  

18. निमंत्रण पत्रिका :
साखरपुडा, लग्न, बारसे, वास्तुशांती किंवा एखाद्या समारंभाची आकर्षक निमंत्रण पत्रिका ही एक प्रतिष्ठेची गोष्ट असते. 

19. वेडिंग अल्बम :
लग्नातील निवडक फोटोंचं कलात्मक मिक्सिंग करून बनवलेला आकर्षक अल्बम हा सुद्धा ग्राफिक डिझाईनचाच एक उत्तम नमुना आहे.

20. इव्हेन्ट मॅनेजमेंट :
वाढदिवस, लग्न समारंभ, सत्कार समारंभ, बक्षीस वितरण समारंभ, वर्धापन दिन, प्रदर्शन, नाटक अशा  कार्यक्रमासाठी स्टेजवर जे डेकोरेशन करायचे असते ते ग्राफिक डिझाईनच असते.  

21. जाहिरात एजन्सी :
एखादी कंपनी, प्रॉडक्ट किंवा सेवा यांचं टोटल ब्रॅण्डिंग करण्याचं काम जाहिरात एजन्सी करते, कोणताही बिझनेस वाढवण्यासाठी जाहिरात आणि मार्केटिंगची गरज असतेच. यामध्ये मार्केटिंग कौशल्यासह सर्वात महतवाचा वाटा ग्राफिक डिझाईनचा असतो.

ग्राफिक डिझाईन हे केवळ प्रिंट मिडियापुरतं मर्यादित नसून ते वेगाने पसरणाऱ्या वेब, मोबाईल ऍप आणि सोशल मिडीयाचा कणा बनलं आहे.

22. वेब डिझाईन :
बॅक एंडला कितीही स्ट्रॉंग असली तरी वेबसाईट फ्रंट एंडला चांगली दिसण्यासाठी शेवटी ग्राफिक डिझाईनच लागतं. वर्डप्रेस सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून कोडिंग शिवाय सहज वेबसाईट बनवता येते. 

23. ब्लॉग डिझाईन :
वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रमोशनसाठी वेबसाईटवर नियमित संबंधित आर्टिकल्स पब्लिश करण्यासाठी ब्लॉग असतो. 

24. सोशल मिडिया डिझाईन :
करमणूक, शिक्षण, बातम्या, प्रमोशन अशा सर्वच क्षेत्रातील ताज्या घडामोडीची त्वरित माहिती देणारा आणि व्यावसायिकाला थेट त्याच्या ग्राहकांपर्यंत पोहोचविणारा  मिडिया म्हणजे सोशल मिडिया. व्यावसायिक स्पर्धेत स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी सोशल मिडियामध्ये कल्पक जाहिरात आणि प्रमोशनल पोस्ट डिझाईन करावे लागते. 

25. डिजिटल मार्केटिंग :
स.एम.एस. मार्केटिंग, व्हाट्सअप मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, फेसबुक, गुगल ऍड, लीड जनरेशन आणि  वेब अनॅलिटीक्स, अशा अनेक गोष्टी डिजिटल मार्केटिंगमध्ये येतात. आणि या सर्वांसाठी सर्वप्रथम ग्राफिक डिझाईनची गरज असते. 

26. ऍनिमेशन :
टूडी, थ्रीडी ऍनिमेशन, वेब ऍनिमेशन, टेक्स्ट ऍनिमेशन, व्ही.एफ.एक्स. इफेक्टस अशा सर्व प्रकारच्या ऍनिमेशनमध्ये कंपोझिशनला खूप महत्व असते. थोड्या थोड्या फरकाने असलेल्या फ्रेम्सपासून ऍनिमेशन बनते. आणि त्या ऍनिमेशनमधील प्रत्येक फ्रेम म्हणजे ग्राफिक डिझाईनच असते.

27. फिल्म मेकिंग :
टीव्ही ऍड, डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म आणि फुल फिल्म सुद्धा हलतं बोलतं ग्राफिक डिझाईनच असतं. डायलॉग, गाणी आणि संगीत रचना हे सुद्धा ग्राफिक डिझाईनच आहे. 

सारांश, 

ग्राफिक डिझाईन ही एक कला दृष्टी आहे. कोणतंही काम सर्वोत्तम करण्यासाठी लागणारे कला कौशल्य म्हणजेच ग्राफिक डिझाईन आहे. बिल्डिंग प्लॅन, इंटेरिअर डिझाईन, आर्किटेक्चरल पर्स्पेक्टिव्ह, फॅशन डिझाईन, टेक्स्टाईल डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन अशा कितीतरी गोष्टी आहेत कि ज्यासाठी ग्राफिक डिझाईन लागतं. यावरून ग्राफिक डिझाईन आणि त्यामधील करिअरची व्याप्ती तुमच्या लक्षात आली असेल. ग्राफिक डिझाईनमधील करिअरच्या अनेक संधी असलेल्या अशा अनेक क्षेत्रांपैकी  तुमच्या आवडीच्या कोणत्याही क्षेत्रात तुम्ही करिअर घडवू शकता.

₹999
₹1,999
₹999
₹1,999
₹11
₹999

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top