Course Introduction

परिपूर्ण ग्राफिक डिझाईनर बनण्यासाठी वर्षभरात ह्या पाच गोष्टी आपण शिकणार आहोत.

ग्राफिक डिझाईनरला विविध प्रकारच्या प्रिंटिंगसाठी,  वेबसाईट्ससाठी आणि सोशल मिडियासाठी  डिझाईन्स बनवायची असतात, ही सर्व प्रकारची डिझाईन्स बनविण्यासाठी वेगवेगळी सॉफ्टवेअर्स, कला, कल्पना आणि विविध कौशल्ये शिकावी लागतात. या बाबतीत प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असला तरी ही डिझाईन्स बनविण्यासाठी काही कॉमन गोष्टी अशा आहेत कि त्या क्रमशः स्टेप बाय स्टेप शिकाव्याच लागतात. नियमित सराव करावा लागतो. तरच तुम्ही कोणत्याही प्रकारचे डिझाईन बनवू शकता. तरच तुम्हाला सहज नोकरी मिळते किंवा तरच तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. आणि  हमखास तुमचं करिअर घडतं. त्यासाठी किमान ह्या पाच गोष्टी आपण ह्या कोर्समध्ये शिकणार आहोत. 

व्हेक्टर ग्राफिक डिझाईन : (CorelDRAW)

व्हेक्टर ग्राफिक डिझाईन ही ग्राफिक डिझाईन शिकण्याची पहिली स्टेप आहे. व्हेक्टर ग्राफिक डिझाईनमध्ये लाईन्स, शेप्स ड्रॉ करून विविध कलर्स आणि काही इफेक्ट्सच्या साहाय्याने डिझाईन बनवायचे असते. त्यामध्ये आकर्षक लेआऊट / कॉम्पोझिशनच्या दृष्टीने खूप काही शिकावं लागत. व्हेक्टर डिझाईन हे कोणत्याही साईजमध्ये बनवून ते कितीही लहान किंवा मोठे केल्याने डिझाईनच्या क्वालिटीमध्ये काहीही फरक पडत नाही. पण हे करत असताना काही बेसिक गोष्टी समजून घ्याव्या लागतात. व्हेक्टर ग्राफिक डिझाईनसाठी अनेक सॉफ्टवेअर्स आहेत पण प्रोफेशनल क्रिएटिव्ह डिझाईन बनवण्यासाठी विशेषतः कोरल ड्रॉ किंवा इलस्ट्रेटर यापैकी कोणतेही सॉफ्टवेअर वापरले तरी चालते. व्हेक्टर ग्राफिक डिझाईनची एकदा संकल्पना समजली कि तुम्ही इतर कोणतेही व्हेक्टर ग्राफिक सॉफ्टवेअर सहज शिकू शकता. पण अगोदर कोणतेही एक सॉफ्टवेअर शिकून व्हेक्टर ग्राफिक डिझाईनची मूळ संकल्पना समजून घ्या. 

रास्टर ग्राफिक डिझाईन : (Photoshop)

व्हेक्टर ग्राफिक डिझाईन शिकल्यानंतर रास्टर ग्राफिक शिकणं ही ग्राफिक डिझाईन शिकण्याची दुसरी महत्वाची स्टेप आहे. रास्टर ग्राफिक डिझाईनमध्ये प्रामुख्याने इमेज एडिटिंगचा अभ्यास असतो. इमेज ही असंख्य कलर पिक्सल्सनी बनलेली असते. एक पिक्सल म्हणजे एक कलर असतो. इमेजची क्वालिटी पिक्सल्सच्या संख्येवर अवलंबून असते. कॅमेऱ्याने काढलेला फोटो आणि स्कॅन केलेली कोणतीही इमेज हा रास्टर ऑब्जेक्ट असतो. दोन किंवा अधिक फोटो / इमेजीस एकत्र घेऊन विशिष्ट पद्धतीने हव्या त्या साईजमध्ये  डिझाईन बनवायचं असतं. इथे इमेजचा साईज कमी केला तरी चालतो. पण जर साईज मोठा केला तर इमेजची क्वालिटी बिघडते. म्हणून इमेज एडिट करताना खूप काळजी घ्यावी लागते. परफेक्ट फोटोएडिटिंग आणि मिक्सिंग करून क्रिएटिव्ह डिझाईन बनवताना अत्यंत महत्वाच्या काही बेसिक गोष्टी समजून घेऊन नियमित सराव करावा लागतो. कला, कल्पनेसह फोटोमिक्सिंगची विविध कौशल्ये शिकायची असतात. रास्टर ग्राफिक डिझाईन अर्थात फोटो एडिटिंगसाठी विविध ऍप्स आणि सॉफ्टवेअर्स आहेत, पण फोटोशॉप हे इमेज एडिटिंगसाठी एकमेव जगमान्य सॉफ्टवेअर आहे.  

प्रि-प्रेस डिझाईन :

व्हेक्टर आणि रास्टर ग्राफिक डिझाईन एकत्र करून विविध प्रकारच्या प्रिंटिंगसाठी प्रिंटिंगच्या प्रकारानुसार ग्राफिक डिझाईन करण्याच्या पद्धती म्हणजेच प्रि-प्रेस डिझाईन. ह्यामध्ये प्रिंट टेक्नॉलॉजीचा अभ्यास करून त्यानुसार डिझाईन बनवावे लागते. ऑफसेट प्रिंटिंग, स्क्रीन प्रिंटिंग, रोटो ग्रेव्हिअर प्रिंटिंग, फ्लेक्झो प्रिंटिंग, डिजिटल प्रिंटिंग असे प्रिंटिंगचे अनेक प्रकार आहेत. डिझाईनमध्ये  फ्लायर, फोल्डर, पोस्टर, बॅनर डिझाईन, न्यूज पेपर डिझाईन, मॅगझीन ऍड डिझाईन, पाऊच पॅकेजिंग डिझाईन, बॉक्स पॅकेजिंग डिझाईन अशा अनेक प्रकारची डिझाईन्स बनवताना ज्या त्या प्रकारच्या प्रिटिंगनुसार विशिष्ट पद्धतीने डिझाईन आणि प्रिंट रेडी आर्टवर्क बनवायचे असते. कोरल ड्रॉ आणि फोटोशॉप एकत्र वापरून प्रिंटिंगसाठी अशी डिझाईन्स बनवताना कला, कल्पना आणि कैशल्याची गरज असतेच. हा सारा अभ्यास ह्या प्रि-प्रेस डिझाईन कोर्स मध्ये आहे. 

वेब डिझाईन आणि ब्लॉगिंग : WordPress

प्रिंट मिडिया नंतर ग्राफिक डिझाईन इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मागणी असलेलं क्षेत्र म्हणजे वेब डिझाईन आणि ब्लॉगिंग. पहिल्या तीन कोर्सेसमधून डिझाईनची संकल्पना समजलेली असते. त्यामुळे वेब डिझाईन शिकताना थोडं सोपं होतं. किंबहुना वेब डिझाईन बनवताना आधीच्या तीन कोर्समधील अभ्यासाचा नक्कीच उपयोग होतो. फक्त डिझाईन बनवण्याची पद्धत आणि प्लॅटफॉर्म वेगळा असतो. जगातील एकूण वेब साईट्सपैकी 40 टक्के वेब साईट्स ज्या प्लॅटफॉर्मवर बनल्या आहेत त्या वर्डप्रेस प्लॅटफॉर्मवर वेबसाईट आणि ब्लॉग बनवायचा अभ्यास ह्या वेब डिझाईन आणि ब्लॉगिंग कोर्स मध्ये आहे. ह्या मध्ये डोमेन रजिस्ट्रेशन, डोमेन आणि होस्टिंग कंट्रोल पॅनल, वर्डप्रेस इन्स्टॉलेशन, वेब पेजेस बनवणे, ब्लॉग पोस्टिंग, विविध फॉर्म्स आणि वेब साईटसाठी आवश्यक इतर अभ्यास असतो. 

सोशल मिडिया डिझाईन : 

ऍडव्हर्टायझिंग, मार्केटिंग आणि बिझनेस प्रमोशनसाठी सध्याचा सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय  मिडिया म्हणजे सोशल मिडिया आहे. प्रत्येकाच्या हातात असलेल्या मोबाईल मध्ये पोहोचलेल्या फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम सारख्या सोशल मिडियामध्ये बिझनेस प्रमोशनसाठी आकर्षक  डिझाईन आणि व्हिडीओ बनविण्याचा हा कोर्स आहे. त्यामध्ये फेसबुक बिझनेस पेज तयार करणे, युट्युब चॅनल बनविणे आदी गोष्टी येतात. पहिल्या चार कोर्समधील अभ्यासावर आधारित वेगवेगळ्या पद्धतीने ज्या त्या मिडियानुसार इफेक्टिव्ह डिझाईन आणि व्हिडीओ बनवून पोस्ट करणे, लीड्स जनरेट करण्यासाठी कल्पक जाहिरात डिझाईन करणे. आदी प्रॅक्टिकल अभ्यास ह्या कोर्समध्ये आहे. डिजिटल मार्केटिंगसाठी ग्राफिक डिझाईनचा हा साधा आणि सोपा ऑनलाईन कोर्स आहे. जो करून ग्राफिक डिझाईनच्या इतर प्रोजेक्ट्सबरोबर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आणि तुमच्या कस्टमरच्या व्यवसायासाठी आकर्षक डिझाईन्स आणि व्हिडीओ पोस्ट करून फ्री आणि पेड प्रमोशन करू शकता.  

हमखास नोकरी मिळविण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी वरील पाचही विषयांचा क्रमशः प्रॅक्टिकल अभ्यास ह्या कोर्समध्ये आहे. हा कोर्स पूर्ण केल्यावर ऍडव्हर्टायझिंग, प्रिंटिंग, वेब आणि सोशल मिडियासाठी कोणत्याही प्रकारचे डिझाईन करण्याची क्षमता तुमच्याकडे नक्कीच येईल. तेंव्हा तुम्हाला एक परिपूर्ण ग्राफिक डिझाईनर म्हणता येईल.

ग्राफिक डिझाईन क्षेत्र खूप मोठे आहे, दररोज नवीन टेक्नॉलॉजी येत असते त्यासाठी नियमित अभ्यास करून अपडेट राहण्याची गरज असते. ग्राफिक डिझाईन हे केवळ डिझाईन नाही तर ती एक कल्पक दृष्टी आहे, सृजनशील विचार आहे, विविध माध्यमांद्वारे व्यवसाय वृद्धीचं परिणामकारक साधन आहे. ग्राफिक डिझाईन म्हणजे काय? ग्राफिक डिझाईनची व्याख्या आणि स्पष्टीकरण आपण पुढच्या लेसनमध्ये समजून घेणार आहोत.  

Scroll to Top