Graphic Design Online / Offline Courses

Graphic Design in Canva with AI
नेहमी लागणाऱ्या विविध प्रकारच्या डिझाईन्ससाठी Canva हे जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे. ज्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सह सर्व प्रकारचे प्रिंट डिझाईन, वेब डिझाईन, सोशल मिडिया डिझाईन, इमेज एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग अशा सर्व प्रकारची ग्राफिक डिझाईन्स कुणीही सहज बनवू शकते. शालेय विद्यार्थ्यांपासून कलेची आवड असणारे विद्यार्थी, कॉलेज स्टुडंट्स, शिक्षक, गृहिणी, नोकरदार, व्यावसायिक या सर्वांसाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे.
ग्राफिक डिझाईन आता कुणीही करू शकतं!
ग्राफिक डिझाईन बनवणं इतकं सोपं पूर्वी कधीच नव्हते. ग्राफिक डिझाईनसाठी सुरुवातीला विचार करावा लागतो. तो विचार AI करतं. कल्पना सुचावी लागते. कल्पना AI सुचवतं. हेडलाईन कोणती असावी? मजकूर कसा असावा हे AI सांगतं. डिझाईनसाठी लागणारा फोटो किंवा इलस्ट्रेशन AI करून देतं. एवढंच नाही तर ले-आऊट आणि रंगसंगती हेही AI सांगतं. आपण AI ला फक्त कोणतं डिझाईन पाहिजे तेवढं सांगायचं. आणि त्याने दाखवलेल्या डिझाईन मधून आपण एक निवडायचं. आणि ते थोडं फार एडिट करून फायनल करायचं. AI व्हिडीओ बनवायला मदत करतं, व्हिडिओची स्क्रिप्ट लिहून देतं. दिलेल्या स्क्रिप्ट मध्ये थोडा बदल पाहजे असल्यास तो बदलही करून देतं. स्क्रिप्ट वाचून हव्या त्या आवाजात व्हाईस ओव्हर करून देतं. आपण फक्त त्याने रेकॉर्ड केलेली फाईल डाऊनलोड करायची आणि व्हिडिओमध्ये वापरायची. डिझाईन बनविताना आपल्याला शंका असेल तर त्या शंकेचं AI निरसन करतं. आपल्याला हवे ते सारे AI करून देतं. पण त्याने करून दिल्यावर ते योग्य / अयोग्य ठरवायची जबाबदारी आपली असते. म्हणून तुम्हाला ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ते परफेक्ट माहित असायलाच हवे.
ग्राफिक डिझाईन बनवायला सर्वोतोपरी मदत करणारी ChatGPT, DeepSeek, Grok, Canva AI, Firefly, Mid Journey अशी एकापेक्षा एक AIs आहेत. पैकी किमान आवश्यक AIs वापरून 21 दिवसात हवं ते ग्राफिक डिझाईन बनविण्यास शिकविणारा हा एकमेव मराठी कोर्स आहे.

CorelDRAW X6 in 30 Days (Marathi)
ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी कोरल ड्रॉचे दरवर्षी नवीन व्हर्जन येत असले तरी त्यामध्ये बेसिक कमांड्स त्याच असतात. ज्या ग्राफिक डिझाईनसाठी आवश्यक असतात. अजूनही प्रोफेशनल आर्टिस्ट X3, X15, X16, X17 ही जुनीच व्हर्जन वापरतात. ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच ग्राफिक डिझाईन शिकणारे विद्यार्थी, प्रिंट पब्लिकेशन व्यावसायिक आणि कलेची आवड असणाऱ्यांसाठी वापरायला एकदम सोपे असणाऱ्या CorelDRAW X6 ह्या व्हर्जनचा कोर्स पब्लिश केला आहे. किमान आवश्यक त्याच कमांड्स वापरून प्रिंट, पब्लिकेशन, पॅकेजिंग आणि बिझनेस प्रमोशनसाठी कोणत्याही प्रकारचे डिझाईन तुम्ही करू शकता.

CorelDRAW 2021 in 30 Days (Marathi)
व्हेक्टर ग्राफिक डिझाईन ही ग्राफिक डिझाईन शिकण्याची पहिली स्टेप आहे. व्हेक्टर ग्राफिक डिझाईनमध्ये लाईन्स, शेप्स ड्रॉ करून विविध कलर्स, टेक्स्ट आणि काही स्पेशल इफेक्ट्सच्या साहाय्याने विशिष्ट साईजमध्ये डिझाईन बनवायचे असते. त्यासाठी आकर्षक आणि परफेक्ट लेआऊट / कॉम्पोझिशनच्या दृष्टीने किमान आवश्यक गोष्टी या कोर्स आपण शिकणार आहात. व्हेक्टर ग्राफिक डिझाईन हे कोणत्याही साईजमध्ये बनवून ते कितीही लहान किंवा मोठे केल्याने डिझाईनच्या क्वालिटीमध्ये काहीही फरक पडत नाही. असे कोणतेही व्हेक्टर ग्राफिक डिझाईन बनविण्यासाठी कोरल ड्रॉ हे प्रोफेशनल आणि एकदम सोपे सॉफ्टवेअर आहे.

Photoshop Basics in 10 Days
रास्टर ग्राफिक डिझाईनमध्ये प्रामुख्याने इमेज एडिटिंगचा अभ्यास असतो. कॅमेऱ्याने काढलेला फोटो आणि स्कॅन केलेली कोणतीही इमेज हा रास्टर ऑब्जेक्ट असतो. दोन किंवा अधिक फोटो / इमेजीस एकत्र घेऊन विशिष्ट पद्धतीने हव्या त्या साईजमध्ये डिझाईन बनवायचं असतं. इथे इमेजचा साईज कमी केला तरी चालतो. पण जर साईज मोठा केला तर इमेजची क्वालिटी बिघडते. म्हणून इमेज एडिट करताना खूप काळजी घ्यावी लागते. कला, कल्पनेसह फोटो मिक्सिंगची विविध कौशल्ये ह्या कोर्स मध्ये आहेत. फोटोशॉप हे इमेज एडिटिंगसाठी एकमेव जगमान्य सॉफ्टवेअर आहे. या बेसिक कोर्समध्ये फोटोशॉपचा किमान आवश्यक प्रॅक्टिकल अभ्यास आहे.