‘All in One Graphic Design Course’ ऑनलाईन कसा शिकाल?

‘All in One Graphic Design Course’ मध्ये वर्षभरात तुम्ही काय काय शिकणार आहात? आणि ऑनलाईन कसे शिकणार आहात? हे थोडक्यात समजून घेण्यासाठी  ‘Try Graphic Design Course’ हा डेमो कोर्स करा.

Step 01 – Student Registration: डेमो किंवा फायनल कोर्स प्रवेशासाठी सर्वात प्रथम स्टुडन्ट रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. त्यासाठी artekeducation.com साईटवर जाऊन Register मेनूवर क्लिक करा, Student Registration फॉर्म भरा. प्रत्येक फॉर्म फिल्डमध्ये योग्य ती आणि अचूक माहिती भरा. 

  • Username हे युनिक शॉर्ट नेम असते. या ठिकाणी स्मॉल लेटर्स मध्ये तुमचे first name किंवा स्पेस न ठेवता स्मॉल लेटर्स मध्ये first name last name किंवा यापैकी उपलब्ध नसेल तर नावापुढे 123 असा एखादा अंक टाइप करा. उदा. yourname207. असे username जे तुमच्या सहजपणे लक्षात राहू शकेल. लक्षात ठेवा Username तुम्ही नंतर बदलू शकत नाही. 
  • First Name च्या ठिकाणी तुमचे नाव टाईप करा. 
  • Last Name च्या ठिकाणी तुमचे आडनाव टाईप करा. 
  • Display Name च्या ठिकाणी तुमचे पूर्ण नाव टाईप करा. (First Name Middle Name Last Name) हे नाव तुमच्या सर्टिफिकेटवर प्रिंट होणार आहे. 
  • Email च्या ठिकाणी तुमचा ईमेल टाईप करा. टाईप झाल्यावर स्पेलिंग पुन्हा चेक करा. 
  • Mobile च्या ठिकाणी तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर टाईप करा. 
  • User Password च्या ठिकाणी कोर्स वेबसाईट लॉगिन करिता नवीन पासवर्ड टाईप करा. (यामध्ये कॅपिटल, स्मॉल लेटर्स, अंक आणि सिम्बॉल कॅरॅक्टरचा समावेश असावा.) आणि हा पासवर्ड बाजूला कुठेतरी लिहून ठेवा. 
  • Confirm Password मध्ये वर टाईप केलेला तोच पासवर्ड पुन्हा टाईप करा. आता Register बटनवर क्लिक करा. आणि काही सेकंद थांबा. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याचा मेसेज दिसेल. (काही एरर आल्यास पेज रिफ्रेश करून पुन्हा रजिस्टर करा.)

Step 02 – तुमचा ई-मेल इनबॉक्स ओपन करा. Artek Education कडून ई-मेल कन्फर्मेशनसाठी आलेला ई-मेल ओपन करा. आणि ई-मेल मधील व्हेरिफिकेशन लिंकवर क्लिक करा. म्हणजे तुमचे रजिस्ट्रेशन कन्फर्म होईल. 

Step 03 – Login मेनूवर क्लिक करून लॉगिन पेजवर जा. User Name किंवा तुमचा ई-मेल आणि पासवर्ड टाईप करून लॉगिन व्हा. लॉगिन झाल्यावर तुमचे अकाऊंट पेज ओपन होईल आणि मेनूबारच्या शेवटी Welcome च्या पुढे तुमचे नाव दिसेल. अकाउंट पेजमध्ये तुम्ही तुमचे प्रोफाईल एडिट करू शकता. तुमचे प्रोफाईल पिक्चर अपलोड करू शकता. तुम्ही प्रवेश घेतलेला कोर्स, सबस्क्रिप्शन ऑर्डर इनव्हाईस आदी माहिती पाहू शकता. गरज असेल तेंव्हा Welcome मेनूमधूनही तुम्ही या अकाउंट पेजवर येऊ शकता. 

Step 04 – आता Courses मेनूमधील Try Graphic Design Demo कोर्सवर क्लिक करा. डेमो कोर्स पेज ओपन होईल. 

Step 05 – डेमो कोर्स पेजवरील Take this Course बटनवर क्लिक करा. 

Step 06 – Enroll Now बटनवर क्लिक करा. 

Step 07 – Billing details फॉर्म भरा. Terms and Conditions चेक बॉक्स टिक करा, आणि Pay and confirm admission बटनवर क्लिक करा. 

Step 08 – QR Code, Debit Card किंवा इतर उपलब्ध कोणत्याही पद्धतीने पेमेंट करा आणि काही क्षण थांबा. ऍडमिशन कन्फर्म होईल आणि Thank You for Admission पेज ओपन होईल. 

Step 09 – Thank You for Admission पेजवर Your Courses च्या खाली Try Graphic Design कोर्सवर क्लिक करा. Demo कोर्स पेज ओपन होईल. (ऍडमिशन कन्फर्म झाल्यावर Thank you for enrolling असा तुम्हाला एक ई-मेल येतो. त्या ई-मेल मधील Course Page URL लिंकवर क्लिक करूनही तुम्ही कोर्स पेज ओपन करू शकता. )

Step 10 – कोर्स पेजवरील Lesson 01 वर क्लिक करून कलासरूम मध्ये जा, या पहिल्या लेसनमध्ये व्हेक्टर ग्राफिक डिझाईनसाठी कोरल ड्रॉ कोर्सविषयीचा थोडक्यात  व्हिडीओ लेसन पहा, त्याखाली दिलेली माहिती वाचा. आणि दुसरा लेसन ओपन करण्यासाठी Mark Complete बटनवर क्लिक करा. 

Step 11 – दुसऱ्या लेसनमध्ये रास्टर ग्राफिक डिझाईनसाठी फोटोशॉप कोर्सविषयीचा थोडक्यात  व्हिडीओ लेसन पहा, त्याखाली दिलेली माहिती वाचा. आणि तिसरा लेसन ओपन करण्यासाठी Mark Complete बटनवर क्लिक करा. 

Step 12 – तिसऱ्या लेसनमध्ये प्रि-प्रेस ग्राफिक डिझाईन कोर्सविषयीचा थोडक्यात  व्हिडीओ लेसन पहा, त्याखाली दिलेली माहिती वाचा. आणि चौथा लेसन ओपन करण्यासाठी Mark Complete बटनवर क्लिक करा. 

Step 13 – चौथ्या लेसनमध्ये वेब डिझाईन अँड ब्लॉगिंग कोर्सविषयीचा थोडक्यात  व्हिडीओ लेसन पहा, त्याखाली दिलेली माहिती वाचा. आणि पाचवा लेसन ओपन करण्यासाठी Mark Complete बटनवर क्लिक करा. 

Step 14 – पाचव्या लेसनमध्ये सोशल मिडिया डिझाईन कोर्सविषयीचा थोडक्यात  व्हिडीओ लेसन पहा, त्याखाली दिलेली माहिती वाचा. आणि सहावा लेसन ओपन करण्यासाठी Mark Complete बटनवर क्लिक करा. 

Step 15 – All in One Graphic Design कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही कोणकोणती डिझाईन्स बनविणार आहात. ते सहाव्या लेसनमध्ये पहा. आणि Mark Complete बटनवर क्लिक करा. एक्झाम पेज ओपन होईल.

Step 16 – आता या डेमो कोर्समधील या सहा लेसन्सच्या आधारे  दहा प्रश्नांची एक छोटी एक्झाम आहे. ती द्या आणि पास झालात तर डेमो सर्टिफिकेटही डाऊनलोड करा. एक्झाम देण्यापूर्वी फारतर सर्व लेसन्स पुन्हा एकदा-दोनदा पाहू शकता. 

Step 17 – Exam Page वरील Start Exam बटनवर क्लिक करा. प्रश्नपत्रिका ओपन होईल. सर्व प्रश्नांची योग्य ती उत्तरे सिलेक्ट करा. 

Step 18 – Exam Summary बटनवर क्लिक करा. 

Step 19 – सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याची खात्री करून Finish Exam बटनवर क्लिक करा. काही सेकंद थांबा. रिझल्ट पेजवर एकूण मार्क्स सहित तुमचा रिझल्ट पहा. 

Step 20 – आता Click Here to Continue बटनवर क्लिक करा. मुख्य कोर्स पेज ओपन होईल. 

Step 21 – कोर्स पेजवर You’ve earned a certificate असा मेसेज दिसेल. त्याच्या पुढेच Download Certificate बटनवर क्लिक करा. सर्टिफिकेट ओपन होईल. ते डाऊनलोड करा.  सर्टिफिकेटवर तुमचे नाव, पूर्ण केलेल्या कोर्सचे नाव, कोर्स पूर्ण केल्याची तारीख आणि वेळ, एकूण मार्क्स आणि User ID आदी गोष्टीचा उल्लेख असतो. 

ह्या शॉर्ट डेमो कोर्सच्या माध्यमातून ग्राफिक डिझाईनमधील विषय, ऑल इन वन ग्राफिक डिझाईन कोर्समध्ये तुम्ही काय शिकणार आहात, ऑनलाईन कसे शिकणार आहात आणि कोर्स पूर्ण केल्यावर अनलिमिटेड करिअर संधी असलेल्या  नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही कोणकोणती डिझाईन्स बनवणार आहात. याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. शिवाय ग्राफिक डिझाईन ऑनलाईन शिकण्याची साधी आणि सोपी पद्धतही समजली असेल. तुम्ही तुमच्या वेळेत, तुमच्या सवडीनुसार केंव्हाही आणि कुठेही हा कोर्स करू शकता.

₹19,999
₹19,999

All in One Graphic Design Course with AI (Online)

This one-year professional online course includes Corel Draw for vector graphic design, Photoshop for raster graphic design, color study, and comprehensive pre-press graphic design techniques for all types of printing. After printing, there is practical training in web design and blogging on the WordPress platform. Finally, there is a study of social media design for business growth. Get Job or start your own business. This is the best and only option for a career in graphic design for everyone who has a passion for art.

Scroll to Top