Graphic Design in Canva with AI

ग्राफिक डिझाईनसाठी कोरल ड्रॉ, फोटोशॉप, इलस्ट्रेटर, इन-डिझाईन अशी प्रोफेशनल सॉफ्टवेअर्स असताना नेहमी लागणाऱ्या विविध प्रकारच्या डिझाईन्ससाठी Canva हे अतिशय लोकप्रिय सॉफ्टवेअर ठरले आहे. ज्यामध्ये लोगो डिझाईन, बिझनेस कार्ड, फ्लायर, पोस्टर, इन्व्हिटेशन कार्ड, ग्रिटींग कार्ड, वेब डिझाईन, बॅनर, व्हिडीओ रिल्स, सोशल मिडिया पोस्ट, आणि अशा अनेक प्रकारची डिझाईन्स अगदी सहजपणे करता येतात. वैयक्तिक, सामाजिक विविध गरजांसाठी आणि  व्यवसाय प्रमोशनसाठी लागणारी सर्व प्रकारची डिझाईन्स अगदी तयार मिळतात. अनेक डिझाईन्समधून तुमच्या आवडीचे डिझाईन घेऊन, ते एडिट करून तुम्हाला हवे तसे डिझाईन बनवता येतं. वापरायला अतिशय सोपे असलेले हे सॉफ्टवेअर कॉम्प्युटर आणि मोबाईलवर सुद्धा वापरता येते.  मोबाईल आपल्या नेहमीच जवळ असतो, त्यामुळे  केंव्हाही आणि कुठेही बसून तुम्ही ग्राफिक डिझाईन बनवू शकता. आता तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मुळे त्यावर कोणीही अगदी सहजपणे ग्राफिक डिझाईन बनवू शकतो. अनेक विद्यार्थ्यांच्या आग्रहावरून आम्ही Graphic Design in Canva with AI  हा 21 दिवसांचा शॉर्ट कोर्स बनविला आहे. त्याची पहिली बॅच 10 एप्रिल पासून सुरु करीत आहे. कलेची आवड असणारे विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, व्यावसायिक या सर्वांसाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे.

ग्राफिक डिझाईन बनवणं इतकं सोपं पूर्वी कधीच नव्हते. ग्राफिक डिझाईनसाठी सुरुवातीला विचार करावा लागतो. तो विचार AI करतं. कल्पना सुचावी लागते. कल्पना AI सुचवतं. हेडलाईन कोणती असावी? मजकूर कसा असावा हे AI सांगतं. डिझाईनसाठी लागणारा फोटो किंवा इलस्ट्रेशन AI करून देतं. एवढंच नाही तर ले-आऊट आणि रंगसंगती हेही AI सांगतं. आपण AI ला फक्त कोणतं डिझाईन पाहिजे तेवढं सांगायचं. आणि त्याने दाखवलेल्या डिझाईन मधून आपण एक निवडायचं. आणि ते थोडं फार एडिट करून फायनल करायचं. AI व्हिडीओ बनवायला मदत करतं, व्हिडिओची स्क्रिप्ट लिहून देतं. दिलेल्या स्क्रिप्ट मध्ये थोडा बदल पाहजे असल्यास तो बदलही करून देतं. स्क्रिप्ट वाचून हव्या त्या आवाजात व्हाईस ओव्हर करून देतं. आपण फक्त त्याने  रेकॉर्ड केलेली फाईल डाऊनलोड करायची आणि व्हिडिओमध्ये वापरायची. डिझाईन बनविताना आपल्याला शंका असेल तर त्या शंकेचं AI निरसन करतं. आपल्याला हवे ते सारे AI करून देतं. पण त्याने करून दिल्यावर ते योग्य / अयोग्य ठरवायची जबाबदारी आपली असते. म्हणून तुम्हाला ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ते माहित असायलाच हवे. या कोर्समध्ये तुम्ही ते शिकणारच आहात. 

ग्राफिक डिझाईन बनवायला सर्वोतोपरी मदत करणारी ChatGPT, Gemini, Copilot, DeepSeek, Grok, Canva AI, Firefly, Mid Journey अशी एकापेक्षा एक AIs आहेत. पैकी किमान आवश्यक AIs वापरून 21 दिवसात हवं ते डिझाईन बनविण्यास शिकविणारा हा एकच कोर्स आहे. 

Scroll to Top