व्हेक्टर ग्राफिक डिझाईन ही ग्राफिक डिझाईन शिकण्याची पहिली स्टेप आहे. व्हेक्टर ग्राफिक डिझाईनमध्ये लाईन्स, शेप्स ड्रॉ करून विविध कलर्स, टेक्स्ट आणि काही स्पेशल इफेक्ट्सच्या साहाय्याने विशिष्ट साईजमध्ये डिझाईन बनवायचे असते. त्यासाठी आकर्षक आणि परफेक्ट लेआऊट / कॉम्पोझिशनच्या दृष्टीने किमान आवश्यक गोष्टी या कोर्स आपण शिकणार आहात. व्हेक्टर ग्राफिक डिझाईन हे कोणत्याही साईजमध्ये बनवून ते कितीही लहान किंवा मोठे केल्याने डिझाईनच्या क्वालिटीमध्ये काहीही फरक पडत नाही. असे कोणतेही व्हेक्टर ग्राफिक डिझाईन बनविण्यासाठी कोरल ड्रॉ 2021 हे प्रोफेशनल आणि एकदम सोपे सॉफ्टवेअर आहे.