एखादे ग्राफिक डिझाईन करायचे म्हटले तर त्याची एक विशिष्ट प्रोसेस असते. आणि त्या सर्व प्रोसेसमधून आर्टिस्टला जावे लागते. मोठ्या डिझाईन एजन्सीमध्ये प्रत्येक प्रोसेससाठी त्या त्या प्रोसेस संबंधित तज्ज्ञ लोक असतात, आणि शेवटी ते ग्राफिक डिझाईन बनते. उदा. मला चिकन मसाला या प्रोडक्ट्ची जाहिरात बनवायची आहे. तर सुरुवात थिंकिंग पासून होते. त्यासाठी क्रिएटिव्ह आर्ट डायरेक्टर आणि व्हिज्युअलायझर एकत्रपणे थोडी चर्चा करून डिझाईन कसे असायला पाहिजे यावर विचार करायला सुरुवात करतात. उदा. एखादी मध्यवर्ती कल्पना सुचली कि त्यावर आधारित डिझाईनमध्ये कोणता फोटो वापरायला पाहिजे? हेडलाईन कशी असावी, मजकूर काय असावा. हे ठरवले जाते. त्यानुसार फोटोग्राफरला सूचना देऊन त्या कल्पनेनुसार फोटोग्राफी करायला सांगतात. आर्ट डायरेक्टर / व्हिज्युअलायझर यांना लाखो रुपये पगार असतो. कमर्शिअल फोटोग्राफीचे दर अव्वाच्या सव्वा असतात. आणि ते त्यांना मिळतातही. पाच पन्नास फोटो शूट करून त्यातील दोन चार फोटो फायनल होतात. डिझाईनची मध्यवर्ती कल्पना आणि ते फोटो दाखवून कॉपी रायटरला पाचारण करण्यात येते. तो दिवसभर सिगारेट फुकत तीन चार संबंधित हेडलाईन्स आणि त्याखालील मजकून लिहून देतो. थोडक्यात डिझाईनच्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित फोटोज, हेडलाईन्स आणि कॉपी मॅटर तयार होतो. मध्येच डिझाईनमध्ये एखादे इलस्ट्रेशन असावे ठरते. मग हातात पेन्सिल, ब्रश आणि कलर घेऊन इलस्ट्रेटर आर्टिस्ट वाटच पाहत असतो. आर्ट डायरेक्टरच्या सूचनेनुसार एक दोन दिवसात तो पाच -सहा इलस्ट्रेशन्स करतो. सर्वानुमते योग्य ते इलस्ट्रेशन फायनल करून वापरायचे ठरते. एका जाहिरातीच्या ग्राफिक डिझाईनसाठी हा सारा लवाजमा पाच-सहा दिवस काम करून डिझाईनसाठी लागणारे हे सर्व रॉ मटेरियल जमा करतात. आता नंबर लागतो लेआऊट / कॉम्पोझिशन आर्टिस्टचा. बिचारा हा कमर्शिअल आर्टिस्टच असतो. ह्या साऱ्यांच्या अपेक्षा आणि दबावाखाली जाहिरातीचा लेआऊट करायला घेतो. एक दोन दिवसात तो चार-पाच लेआऊट तयार करतो. पुन्हा सारी मंडळी एकत्र जमा होऊन डिझाईनची निवड प्रक्रिया सुरु करतात. सर्वानुमते ठीक वाटलेली एक-दोन डिझाईन्सच्या फायनल प्रिंट काढून अप्रूव्हलसाठी कस्टमरला दाखवण्यासाठी नेतात. किंवा आता ई-मेल किंवा व्हाट्सअप करतात. पुन्हा पुन्हा त्यामध्ये करेक्शन्स करून एकदाचे फायनल प्रिंट किंवा वेब रेडी डिझाईन आणि आर्टवर्क तयार होते. एक ग्राफिक डिझाईन बनविण्यासाठी केवढा हा खटाटोप. मूळ डिझाईनचा चिकन मसाला प्रॉडक्ट, त्याची क्वालिटी, वैशिष्ठे आणि डिझाईनसाठी त्या प्रॉडक्ट विषयी होणाऱ्या चर्चेचा विषय मी इथे घेतला नाही. एखाद्या प्रॉडक्ट किंवा सेवेचे ब्रॅण्डिंग काल होते आणि आजही आहे. पण आज हे काम म्हणजे लहान मुलांचा खेळ झालाय. पण हा पोरखेळ खेळण्यासाठी या विषयाची पूर्ण माहिती असायला हवी, एवढी एकच अट आहे. नाहीतर या पोरखेळाचा कधी कधी खेळ खंडोबा होऊ शकतो ही गोष्ट लक्षात असुद्या.
जाहिरातीच्या टायटल / मजकुरासाठी लागणारे शब्द कौशल्य, लक्ष वेधणारी कल्पना शक्ती, चित्रकारीसाठी लागणारे हस्तकौशल्य, सौंदर्य दृष्टी या गोष्टी संपल्या नाहीत पण आता जुन्या झाल्या, या सर्व कामासाठी वेगवेगळ्या कलाकारांची आता गरज नाही. आता कोणीही हे काम खूपच चांगले आणि कमी वेळेत करू शकतो. डिझाईनसाठी फक्त आर्टिस्टच लागतो या भ्रमात आम्ही आजपर्यंत होतो. पण DeepSeek आणि इतर अनेक आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे पारंपरिक ब्रॅण्ड डिझाईनमधील भ्रमाचा भोपळा फुटून आमचा भ्रमनिरास झाला असला तरी त्याकडे दुर्लक्ष किंवा त्याला सोडून चालणार नाही हे मात्र खरे. स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर आवडीच्या विषयातील परिपूर्ण ज्ञान घ्या आणि सोबत AI चा स्वीकार करा. ग्राफिक डिझाईनर आणि ज्यांना ग्राफिक डिझाईनमध्ये नव्याने करिअर करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी जे जे आवश्यक आहे ते मी इथूनपुढे लिहीनच. पण ज्यांना वर्षात AI सह ग्राफिक डिझाईन मास्टर व्हायचे आहे त्यांच्यासाठी आमचा ‘Graphic Design with Artificial Intelligence’ हा ऑनलाईन / ऑफलाईन कोर्स आहेच. कोर्स माहितीपत्रकासाठी WhatsApp करा.
भागवत पवार, मो. 9371102678