All in One Graphic Design Course (Offline)

आर्टेकच्या ह्या ऑफलाईन कोर्समध्ये व्हेक्टर ग्राफिक डिझाईनसाठी कोरल ड्रॉ, रास्टर ग्राफिक डिझाईनसाठी फोटोशॉप आणि कोणत्याही प्रकारच्या प्रिंटिंगकरिता प्रिंट रेडी आर्टवर्क बनवण्यासाठी प्रि-प्रेस ग्राफिक डिझाईन प्रोसेसचा समावेश आहे. प्रिंटिंगनंतर वेब साईटसाठी वर्डप्रेस प्लॅटफॉर्ममध्ये वेब डिझाईन आणि ब्लॉगिंगचा प्रॅक्टिकल अभ्यास आहे, आणि शेवटी व्यवसायाच्या जाहिरात / प्रमोशनसाठी सोशल मिडिया डिझाईनचा अभ्यास आहे. हा कोर्स कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. नोकरी किंवा व्यवसाय काहीही निवडा. कलेची आवड असणाऱ्यांसाठी ग्राफिक डिझाईनमध्ये करिअरचा हा सर्वोत्तम पर्याय आहे.

Course Subjects

व्हेक्टर ग्राफिक डिझाईन ही ग्राफिक डिझाईन शिकण्याची पहिली स्टेप आहे. व्हेक्टर ग्राफिक डिझाईनमध्ये लाईन्स, शेप्स ड्रॉ करून विविध कलर्स आणि काही इफेक्ट्सच्या साहाय्याने डिझाईन बनवायचे असते. त्यामध्ये आकर्षक लेआऊट / कॉम्पोझिशनच्या दृष्टीने खूप काही शिकावं लागत. व्हेक्टर डिझाईन हे कोणत्याही साईजमध्ये बनवून ते कितीही लहान किंवा मोठे केल्याने डिझाईनच्या क्वालिटीमध्ये काहीही फरक पडत नाही. पण हे करत असताना काही बेसिक गोष्टी समजून घ्याव्या लागतात. व्हेक्टर ग्राफिक डिझाईनसाठी अनेक सॉफ्टवेअर्स आहेत पण प्रोफेशनल क्रिएटिव्ह डिझाईन बनवण्यासाठी विशेषतः कोरल ड्रॉ किंवा इलस्ट्रेटर यापैकी कोणतेही सॉफ्टवेअर वापरले तरी चालते. व्हेक्टर ग्राफिक डिझाईनची एकदा संकल्पना समजली कि तुम्ही इतर कोणतेही व्हेक्टर ग्राफिक सॉफ्टवेअर सहज शिकू शकता. पण अगोदर किमान एक सॉफ्टवेअर शिकून व्हेक्टर ग्राफिक डिझाईनची मूळ संकल्पना समजून घ्यावी लागते. त्यासाठी कोर्सच्या पहिल्या भागात कोरल ड्रॉचा किमान आवश्यक प्रॅक्टिकल अभ्यास आहे.

कोरल ड्रॉमध्ये व्हेक्टर ग्राफिक डिझाईन शिकल्यानंतर रास्टर ग्राफिक शिकणं ही ग्राफिक डिझाईन शिकण्याची दुसरी महत्वाची स्टेप आहे. रास्टर ग्राफिक डिझाईनमध्ये प्रामुख्याने इमेज एडिटिंगचा अभ्यास असतो. इमेज ही असंख्य कलर पिक्सल्सनी बनलेली असते. एक पिक्सल म्हणजे एक कलर असतो. इमेजची क्वालिटी पिक्सल्सच्या संख्येवर अवलंबून असते. कॅमेऱ्याने काढलेला फोटो आणि स्कॅन केलेली कोणतीही इमेज हा रास्टर ऑब्जेक्ट असतो. दोन किंवा अधिक फोटो / इमेजीस एकत्र घेऊन विशिष्ट पद्धतीने हव्या त्या साईजमध्ये  डिझाईन बनवायचं असतं. इथे इमेजचा साईज कमी केला तरी चालतो. पण जर साईज मोठा केला तर इमेजची क्वालिटी बिघडते. म्हणून इमेज एडिट करताना खूप काळजी घ्यावी लागते. परफेक्ट फोटो एडिटिंग आणि मिक्सिंग करून क्रिएटिव्ह डिझाईन बनवताना अत्यंत महत्वाच्या काही बेसिक गोष्टी समजून घेऊन नियमित सराव करावा लागतो. कला, कल्पनेसह फोटो मिक्सिंगची विविध कौशल्ये शिकायची असतात. रास्टर ग्राफिक डिझाईन अर्थात फोटो एडिटिंगसाठी विविध ऍप्स आणि सॉफ्टवेअर्स आहेत, पण फोटोशॉप हे इमेज एडिटिंगसाठी एकमेव जगमान्य सॉफ्टवेअर आहे. म्हणून  कोर्सच्या ह्या दुसऱ्या भागात फोटो शॉपचा किमान आवश्यक प्रॅक्टिकल अभ्यास आहे.

व्हेक्टर आणि रास्टर ग्राफिक डिझाईन एकत्र करून विविध प्रकारच्या प्रिंटिंगसाठी प्रिंटिंगच्या प्रकारानुसार ग्राफिक डिझाईन करण्याच्या पद्धती म्हणजेच प्रि-प्रेस ग्राफिक डिझाईन. ह्यामध्ये प्रिंट टेक्नॉलॉजीचा अभ्यास करून त्यानुसार डिझाईन बनवावे लागते. ऑफसेट प्रिंटिंग, स्क्रीन प्रिंटिंग, रोटो ग्रेव्हिअर प्रिंटिंग, फ्लेक्झो प्रिंटिंग, डिजिटल प्रिंटिंग असे प्रिंटिंगचे अनेक प्रकार आहेत. डिझाईनमध्ये  फ्लायर, फोल्डर, पोस्टर, बॅनर डिझाईन, न्यूज पेपर डिझाईन, मॅगझीन ऍड डिझाईन, पाऊच पॅकेजिंग डिझाईन, बॉक्स पॅकेजिंग डिझाईन अशा अनेक प्रकारची डिझाईन्स बनवताना ज्या त्या प्रकारच्या प्रिटिंगनुसार विशिष्ट पद्धतीने डिझाईन आणि प्रिंट रेडी आर्टवर्क बनवायचे असते. कोरल ड्रॉ आणि फोटोशॉप एकत्र वापरून प्रिंटिंगसाठी अशी डिझाईन्स बनवताना कला, कल्पना आणि कैशल्याची गरज असतेच. हा सारा अभ्यास कोर्सच्या ह्या तिसऱ्या भागात समाविष्ट आहे.

प्रिंट मिडिया नंतर ग्राफिक डिझाईन इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मागणी असलेलं क्षेत्र म्हणजे वेब डिझाईन आणि ब्लॉगिंग. पहिल्या तीन कोर्सेसमधून डिझाईनची संकल्पना समजलेली असते. त्यामुळे वेब डिझाईन शिकताना थोडं सोपं होतं. किंबहुना वेब डिझाईन बनवताना आधीच्या तीन भागातील अभ्यासाचा नक्कीच उपयोग होतो. फक्त डिझाईन बनवण्याची पद्धत आणि प्लॅटफॉर्म वेगळा असतो. जगातील एकूण वेब साईट्सपैकी 40 टक्के वेब साईट्स ज्या प्लॅटफॉर्मवर बनल्या आहेत त्या वर्डप्रेस प्लॅटफॉर्मवर वेबसाईट आणि ब्लॉग बनवायचा अभ्यास कोर्सच्या ह्या तिसऱ्या भागातील वेब डिझाईन आणि ब्लॉगिंगच्या अभ्यासक्रमात आहे. ह्या मध्ये डोमेन रजिस्ट्रेशन, डोमेन आणि होस्टिंग कंट्रोल पॅनल, वर्डप्रेस इन्स्टॉलेशन, वेब पेजेस बनवणे, मेनू डिझाईन, हेडर, फूटर डिझाईन, ब्लॉग डिझाईन आणि पोस्टिंग, विविध फॉर्म्स आणि वेब साईटसाठी आवश्यक इतरही अभ्यास आहे.

ऍडव्हर्टायझिंग, मार्केटिंग आणि बिझनेस प्रमोशनसाठी सध्याचा सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय मिडिया म्हणजे सोशल मिडिया आहे. प्रत्येकाच्या हातात असलेल्या मोबाईल मध्ये पोहोचलेल्या फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम सारख्या सोशल मिडियामध्ये बिझनेस प्रमोशनसाठी आकर्षक बॅनर्स डिझाईन आणि व्हिडीओ बनविण्याचा हा कोर्स आहे. त्यामध्ये फेसबुक बिझनेस पेज तयार करणे, फेसबुक ग्रुप, युट्युब चॅनल बनविणे आदी गोष्टी येतात. पहिल्या चार भागातील अभ्यासावर आधारित वेगवेगळ्या पद्धतीने ज्या त्या मिडियानुसार इफेक्टिव्ह डिझाईन आणि व्हिडीओ बनवून पोस्ट करणे, लीड्स जनरेट करण्यासाठी कल्पक जाहिरात डिझाईन करणे. आदी प्रॅक्टिकल अभ्यास ह्या पाचव्या भागात आहे. डिजिटल मार्केटिंगसाठी ग्राफिक डिझाईनचा हा साधा आणि सोपा ऑनलाईन कोर्स आहे. जो करून ग्राफिक डिझाईनच्या इतर प्रोजेक्ट्सबरोबर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आणि तुमच्या ग्राहकाच्या व्यवसायासाठी आकर्षक डिझाईन्स आणि व्हिडीओ पोस्ट करून फ्री आणि पेड प्रमोशन करू शकता. 

Course Material

ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी तुमच्याजवळ नेहमी असायला हवं एक स्केचपॅड आणि पेन्सिल. दररोज तुम्ही जे काही अनुभवता किंवा जे काही शिकता ते लिहिण्यासाठी एक नोटबुक, कॅमेरा (मोबाईल मधील वापरला तरी चालेल.), कोरल ड्रॉ, फोटोशॉप इन्स्टॉल केलेला आणि हाय स्पीड  इंटरनेट कनेक्शन असलेला हाय कॉन्फिगरेशनचा लॅपटॉप. किमान एवढं कोर्स मटेरियल तुमच्याजवळ असेल तर  तुम्ही ह्या ऑफलाईन कोर्सला प्रवेश घेऊ शकता.

Course Duration: 10 Months

इलेमेंटरी / इंटरमिडिएट ग्रेड परीक्षा पास. मिडिया, व्हिजुअल आर्ट, अप्लाईड आर्ट, फाईन आर्ट, जी.डी. आर्ट, ए. टी. डी. विद्यार्थ्यांना प्राधान्य.

New Batch Starts from 6th Jan. 2025

Morning Batch: 7.30 am to 9.30 am
Evening Batch: 6.30 pm to 8.30 pm

Last Date of Admission 31st Dec. 2024

Admission Form

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Name
Date of Birth
Address
Terms and Conditions
=
Scroll to Top